जि.प. सदस्या अनिता चौगुले यांच्या प्रयत्नातून समर्थ कॉलनीमध्ये रस्ता सिमेंट काँक्रीट रस्त्याचा शुभारंभ

0

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : वडरगे रोड बड्याचीवाडी येथील समर्थ कॉलनीमध्ये सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज (दि.९) मार्च रोजी करण्यात आला.
सदर रस्ता मागील २० वर्षापासून दुर्लक्ष केल्याने प्रलंबित होता, अखेर अनिता चौगुले यांनी पुढाकार घेत आपल्या नागरी सुविधा फंडातून मंजूर केला.आज सदर रस्त्याचा शुभारंभ अनिता चौगुले यांच्यासह नगराध्यक्षा सौ.स्वातीताई कोरी, उपनागराध्यक्षा सौ. सुनिता पाटील, नगरसेवक बसवराज खणगावे, माजी सभापती सौ. जयश्री तेली, मारुतीराव राक्षे, अनिल खोत, वीरुअण्णा चौगुले यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाहून शुभारंभ केला.
यावेळी सर्व मान्यवरांना समर्थ कॉलनी मधील राहिवाश्यांतर्फे श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. श्री. भारत कोळेकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. अनिता चौगुले यांनी भागातील सर्व अडचणी जाणून घेऊन त्या निकाली लावण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. खवणेकर यांनी केले तर पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री. किरण खटावकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी बड्याचीवाडी सरपंच सतीश कोळेकर, उपसरपंच अजित पाटील, सुनिता दळवी, अमर पोटे, विश्वास खोत, सुनिल शिंदे, संदीप झेंडे, विजय फुटाणे, रवींद्र बनगे, अमर म्हेत्री, सुभाष भोई, संदीप रोटे, अरुण शिंदे, प्रकाश पोवार, युवराज आडवकर, कुटे सर, प्रकाश पाटील, पाटील गुरुजी, शामराव देसाई, सुनील देसाई, भोगण, मधुकर मुळे, संदीप कोळेकर, प्रतीक खटावकर, गिरीश रोटे, विष्णू खटावकर आदी मान्यवरांसह कॉलनीतील रहिवासी उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here