कोल्हापूरातून युतीच्या प्रचाराचा नारळ

0

मुंबई (प्रतिनिधी) :

लोकसभा निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्या असून आता प्रत्येक पक्ष प्रचाराकडे लक्ष देऊ लागला आहे. प्रचारसभा करत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा सर्व पक्षांचा प्रयत्न असेल. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं घोडं अद्याप जागावाटपावर अडलं आहे. मात्र शिवसेना-भाजपाने येथेही आघाडी घेतली असून प्रचाराचाही कार्यक्रम ठरला आहे. कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिरात अंबबाईचं दर्शन घेत युतीचा प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असल्याची माहिती आहे. २४ मार्चला कोल्हापुरात शिवसेना-भाजपा युतीची एकत्रित सभा होणार आहे.

भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी युती जाहीर केली आहे. फक्त युतीच नाही तर लोकसभेचा जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर करण्यात आला आहे. लोकसभेसाठी शिवसेना २३ तर भाजपा २५ जागा लढवणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र यामधल्या काही जागांवरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात चढाओढ दिसून येते आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात रात्री उशिरा बैठक पार पडली. या बैठकीत सर्व ४८ मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. बैठकीत आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, सुधीर मुनगुंटीवार आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी कोल्हापुरातून प्रचाराला सुरुवात करण्यावर एकमत झालं. यासोबत नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नवी मुंबई आणि पुण्यातही एकत्र प्रचारसभा घेण्याचं बैठकीत ठरलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here