भाजप सरकार विरोधात युवक काँग्रेसचे नोटा उधळून आंदोलन 

0

सांगली मध्ये आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक नोटा उधळत  भाजपा सरकार विरोधात आंदोलन केले.यावेळी चक्काजाम आंदोलनही करण्यात आले.वाढती महागाईचा निषेधार्त हे आंदोलन करण्यात आले . 

 सांगली शहरा मध्ये आज रस्त्यावर दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांचा पाऊस पडला . मात्र पाऊस खऱ्या नोटांचा नव्हता तर प्रतिकात्मक नोटांचा होता.भाजपा सरकारच्या कारभारा विरोधात सांगली विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आला.शहर कॉंग्रेस कमिटी समोर यावेळी बुलेट ट्रेन नको, सरसकट शेतकरी कर्जमाफी करावी अशी मागणी करत वाढती महागाई आणि नोटाबंदीच्या निषेधार्त मोदी सरकारच्या प्रतिकात्मक नोटा उधळण्यात आल्या.यामुळे याठिकाणी पैशांचा पाऊस पडत असल्याची स्थिती निर्माण झाली होती. तसेच यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी चक्काजाम करत रास्ता रोखुन धरला होता.यामुळे या मार्गावरील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती.यावेळी भाजपा सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली .विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेस अध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here