फेब्रुवारीपर्यंतच तुमचं सिम राहणार…?

0

आधारकार्डशी जोडा अन्यथा बंद होणार सिम…केंद्राचा कालावधी निश्चित…

फेब्रुवारी 2018 पर्यंत तुमचं सिम आधारकार्डशी लिंक करावं लागणार आहे अन्यथा सिम बंद केलं जाणार आहे.यासंदर्भाचा कालावधी केंद्रसरकारनं निश्चित केला आहे. सुप्रीम कोर्टाने फेब्रुवारी 2017 मध्ये पडताळणीसाठी आधारकार्डशी सिम लिंक करण्याचे आदेश सरकारला दिले होते. त्यामुळेच हा कालावधी केंद्रानं निश्चित केलाय.
फेब्रुवारी 2016 पर्यंत देशात जवळपास 105 कोटी मोबाईल ग्राहक होते. दूरसंचार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार यापैकी 5 कोटी सिम कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी न करता देण्यात आले आहेत. बनावट ओळखपत्रावर घेतलेले क्रमांक दहशतवादी किंवा इतर गुन्ह्यांसाठी वापरण्यात येतात. आता मोबाईल क्रमांक बँकिंगशी जोडल्याने गैरप्रकार होण्याचाही धोका आहे. त्यामुळे सर्व क्रमांकांची पडताळणी व्हावी, अशी याचिका सुप्रीम कोर्टात लोकनिती फाऊंडेशन या एनजीओकडून करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हा आदेश दिला होता.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सरकारने पडताळणी प्रक्रिया एका वर्षाच्या आत करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आता सरकारने पडताळणी प्रक्रियेसाठी कालावधी निश्चित केला आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2018 पर्यंत सिम पडताळणी करुन घ्यावं लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here