नोटाबंदीच्या निषेधार्थ युवकांचेहीआंदोलन

0

राजु म्हस्के
8 नोव्हेंबर 2016 रोजी नरेंद्र मोदी यांनी 500 आणि हजारच्या नोटा चालनातून बंद करण्याचा निर्णय घेतला होता तो निर्णय मोदी यांनी सवंग प्रसिद्धीसाठी आत्मकेंद्री घेतला होता. देशातील प्रत्येक माणसाला रांगेत उभे करून नागरिकांचा छळ करण्यात आला, रांगेत उभे असताना अनेक लोकांना जीव गमवावा लागला. नोटांबंदी लागू केल्यानंतर 50 दिवसात 65 वेळा नियम बदलून छळ करण्यात आला.
आज नोटबंदीला एक वर्ष पूर्ण होत आहे ज्या उद्दिष्टासाठी नोटबंदी करण्यात आली होती ते उद्दिष्ट साध्य होताना दिसत नाही. नोटबंदीचा निर्णयामुळे आज देशात 15 लाख लोक बेरोजगार झाले आहेत. ज्यावेळेस नोटबंदी लागू करण्यात आली होती त्यावेळेस शेतकऱ्याचे पीक हाती आले होते त्या पिकाला बाजार भाव मिळाला नाही. शेतकऱ्याच्या घरात त्या कालावधीमध्ये मुला-मुलींचे लग्न होते त्यासाठी पैसे उपलब्ध होऊ शकला नाही त्याचे कारण म्हणजे नोटांबंदी. देशाचा आर्थिक वृद्धी चे कारण ही नोटांबंदी आहे याच्या निषेधार्थ सिडको कॅनॉट गार्डन येथे युवकांनी आंदोलन केले. यावेळी युवकांनी घोषणा देत आपापले मते व्यक्त केले. यावेळी अर्थतज्ञ एच. एम.देसरडा, शरद पवार, ओंकार लिंबेकर, अक्षय पुराणिक, अशोक हिवाळे, फिरोज शहा, शाम गुंजाळ, आशिष मेटे, सतीश भालेराव, शुभम गिरी, वैभव डहाके, शैलेश तुपे, भाग्यश्री राजपूत, रवी आंबेकर, अक्षय कांबेकर, कृष्णा जाधव, नितीन ढवळे, अनिल गाडेकर, दिवाकर माने यांच्यासह अन्य युवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here