ग्रामीण भागातील युवकांना स्वच्छता प्रशिक्षणाबरोबरच रोजगारही मिळणार -डॉ. दीपक सावंत

0

आरोग्य क्षेत्रात विविध सेवा पुरविण्यासाठी प्रशिक्षीत कुशल मनुष्यबळ निर्माण होण्याकरीता कुटुंब कल्याण प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या वतीने ‘आरोग्याची निगा आणि कौशल्य प्रशिक्षण’ अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या सोहळ्यास कौशल्य विकास विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यावेळी उपस्थित होते.वैयक्तीक आणि सार्वजनिक स्वच्छतेची काळजी घेतल्यास अनेक रोगांवर प्रतिबंध मिळवू शकतो असे सांगून आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले की, ही बाब लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, कौशल्य विकास आणि नगरविकास यांच्या विभागांच्या समन्वयातून युवकांना आरोग्य क्षेत्रातील कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराची संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.स्वच्छतेच्या अभावामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. उघड्यावर शौच करणे सर्व रोगांचे मूळ असून स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून राज्यात हाणदारीमुक्त गाव आणि शहरे ही मोहिम यशस्वीरित्या राबविली जात आहे. ग्रामीण भागात आरोग्याबाबत जाणीवजागृती व्हावी आणि आजारावर उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या माध्यमातून मात करण्यासाठी ग्रामीण भागातील युवकांना हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. वैयक्तीक स्वच्छता राखावी स्वच्छ हात धुवावेत या सवयींमुळे निरोगी आरोग्यराखण्यास मदत होणार आहे.हा अभ्यासक्रम शिकविताना स्थानिक भाषेचा वापर करावा, असे आवाहन करीत आरोग्यमंत्री म्हणाले की, या प्रशिक्षणामुळे रोजगाराचा प्रश्न मिटण्यास मदत होईल. सॅनीटरी इन्स्पेक्टर, डायबेटीक एज्युकेटर, हॉस्पिटल एड असिस्टंट, होम एड असिस्टंट, फर्स्ट रिस्पाँडर या विषयावरील अभ्यासक्रम या अंतर्गत शिकविला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here