अनगर येथे योग शिबिर संपन्न

कै. शं. बा. पाटील महाविद्यालयाच्या साथीने अनगर येथे योग शिबीर

0

सर्व विध्यार्थ्यांना विद्यार्थी जीवनातच व्यक्तीला आरोग्यविषयक चांगल्या सवयी लागाव्यात, या उद्देशाने तालुक्यातील अनगर येथील कै. शं. बा. पाटील महाविद्यालयात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. योगाचे महत्व सर्व जगाने मान्य केले आहे. विद्यार्थी जीवनातच आरोग्याचे महत्त्व पटावे म्हणून दरवर्षी योग शिबिराचे आयोजन या महाविद्यालयाच्या वतीने केले जाते.

सध्या मानवी जीवनास अनेक व्याधींचा सामना करावा लागत आहे. या व्याधींवर योगाद्वारे मात केली जाऊ शकते हे सिद्ध झाले आहे. आपली प्रकृती उत्तम राहावी यासाठी नित्य योग करणे खूप गरजेचे आहे. शालेय ज्ञानासोबत आरोग्यविषयक चांगले धडे विद्यार्थ्यांना मिळावे म्हणून या शिबिराचे आयोजन दरवर्षी करत असल्याचे प्राचार्य चंद्रकांत ढोले यांनी सांगितले. या वर्षी प्रथमच विद्यार्थ्यांसोबत पालकांसाठी देखील या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते असेही त्यांनी यावेळी सांगितले. मोहोळ तालुक्यातील योगगुरु हनुमंत बंडगर यांनी या शिबिरात विद्यार्थी व पालक यांना योगाचे धडे दिले.

पालकांसाठी पहाटेच्या वेळी योगासने घेण्यात आली यावेळी अनगर गावचे सरपंच अंकुश गुंड, प्राचार्य चंद्रकांत ढोले, मुख्याध्यापक एस. के. बोराडे, शिक्षक बी. बी. बोडके व सुमारे दीडशे ते दोनशे पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी योगाचे धडे देत असताना त्या आसनाचे महत्त्व देखील श्री. बंडगर यांनी विद्यार्थ्यांना समजावून दिले. यावेळी योगासना सोबत प्राणायामाचे देखील प्रात्यक्षिक घेण्यात आले. महाविद्यालयातील सुमारे दोन हजार विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले होते. महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक परिसरात होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here