एम आर प्रशालेत महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जयंती उत्साहात साजरी

0

 

गडहिंग्लज : जिल्हा परिषद संचलित, कोल्हापूर महाराणी राधाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला गडहिंग्लज येथे स्वतंत्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपपंतप्रधान ना. यशवंतराव चव्हाण यांची १०६वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.. प्रशालेचे माजी प्राचार्य आर के कोडोली यांच्या हस्ते प्रतिमापुजन करण्यात आले. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चाललेल्या लढाईतील आम्ही सैनिक आहोत. देशाच्या स्वातंत्र्यासाठी पडेल तो त्याग करावयास आम्ही सिद्ध आहोत, प्रसंगी आम्ही आमचे प्राणही अर्पण करणार आहोत, असे उदगार महाराष्ट्राचे शिल्पकार, पहिले मुख्यमंत्री ना यशवंतराव चव्हाण यांनी ‘स्वातंत्र्याची हाक’ या लेखात काढून गरीबातील गरीब जनतेला विकासाची चव चाखता यावी यासाठी अहोरात्र त्यांनी कार्य केले. अशा अष्टपैलू विभुती विषयी माहिती प्रा सुषमा पाटील यांनी दिली. तसेच प्रा विकास पाटील यांनी शेती, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व याविषयी मत प्रतिपादन केले.
प्रा. बी टी यादव यांनी प्रास्ताविक प्रा शितल शिंदे यांनी आभार मानले. यावेळी माजी प्राचार्य एम बी कुंभार, श्री. आर वाय नाईक,प्रा आशालता मगर प्रा हर्षवर्धन काटकर काटकर, प्रा संजय कुंभार, प्रा युवराज पाटील, प्रा महेश शिंदे, प्रा रोहिणी सोहनी, प्रा पुनम तळगुळकर, प्रा सुप्रिया कोटीवाले, प्रा वैशाली साबळे, प्रा मेघा जाधव, प्रा स्वाती खोपडे, श्री जे जे तळपे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here