राजपूत समाजाने घेतलेले आक्षेप दूर झाल्याशिवाय पद्मावती सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने  परवानगी देऊ नये – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

0

मुंबई पद्मावती सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिली नसताना त्या सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमाची मीडिया स्क्रिनिंग करून मोठी चूक केली आहे. पद्मावती या मेवाड च्या  महान राणी होत्या. संपूर्ण राजपूत समाजाची त्यांच्याबद्दल प्रचंड आदर श्रद्धा  भावना जुळलेल्या आहेत.अश्या ऐतिहासिक संवेदनशील विषयांवर सिनेमा काढताना कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेतली गेली पाहिजे. राजपूत समाजाने पद्मावती सिनेमाबाबत जे आक्षेप नोंदविले आहेत त्याचा विचार करून पद्मावती सिनेमातील आक्षेप असलेली दृश्य सेन्सॉर बोर्डाने कट करून तसेच राजपूत समाजाच्या  आक्षेपांचे निराकरण झाल्यानंतरच पद्मावती सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने प्रदर्शनाची परवानगी द्यावी अशी सूचना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज केली .  तसेच पद्मावती सिनेमा विरुद्ध कोणीही हिंसक धमकी देऊ नये ; कायदा हातात घेऊ नये  . सनदशीर शांततेच्या मार्गाने  विरोध करण्याचा राजपूत समाजाला अधिकार आहे मात्र त्यांनी कोणत्याही कलाकाराला  हिंसक धमकी देता कामा नये  असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी आज केले.

मुंबईत मंत्रालयातील  7 व्या मजल्यावरील समिती कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 काल बांद्रा येथील संविधान निवासस्थानी   राजपूत समाजच्या शिष्टमंडळाने ना . आठवलेंची भेट घेऊन पद्मावती सीनेमाबाबत राजपूत समाजाच्या  असलेल्या आक्षेपांची माहिती दिली.   या शिष्टमंडळात राजस्थान प्रवासी परिषद आणि कर्णी सेनेचे पदाधिकारी  उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here