आम्ही कर्जमाफी केली तशी कर्जमाफी करुन शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढा – शरद पवार

0

 यवतमाळ आम्ही ज्याप्रकारे कर्जमाफी करुन शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढले त्याचपध्दतीने  या सरकारनेही शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी करायला हवी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी यवतमाळ येथे कार्यकर्ता मेळाव्यात केली.

 यवतमाळमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. शरद पवार पुढे म्हणाले की, येथे शेतीचे प्रश्न मांडत असताना या जिल्हयातून वर जावून ज्यांनी राज्याचे नेतृत्व केले त्या वसंतराव नाईक यांचे स्मरण झाले. मी पहिल्यांदा राज्यमंत्री झालो तेव्हा नाईक यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. या जिल्हयात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत. मी कृषीमंत्री असताना मला माहिती मिळाली की यवतमाळमध्ये काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मला त्या रात्री झोप लागली नाही. मी थेट त्यावेळी  पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली आणि उपाययोजना करण्याबाबत सांगितले होते.

 या मेळाव्याला माजी मंत्री मनोहर नाईक, माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, वसुधाताई देशमुख, माजी मंत्री सुभाष ठाकरे, गुलाबराव गावंडे, आमदार प्रकाश गजभिये, आमदार ख्वाजा बेग, आमदार रामराव वडकुते, माजी आमदार संदीप बाजोरीया, जिल्हाध्यक्ष नाना गाडबैल, माजी जिल्हापरिषद अध्यक्षा आरती फुफाटे, उत्तमराव शेळके, वसंत घुईखेडकर, महिला जिल्हाध्यक्षा क्रांती धोटे, युवती जिल्हाध्यक्षा मनिषा काटे आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here