तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी लढणार – उदयनराजे 

तृतीयपंथीयांनाही अधिकार

0

पुणे -छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांनी फ्रेंडशिप डे अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. त्यांनी तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी लढणार असल्याचे सांगितले.

खासदार उदयनराजे म्हणाले की, आपण सर्वांनी राष्ट्रगीत गायलेले आहे. राष्ट्रगीताच्या एका शब्दाचे अनुकरण जरूर केले पाहिजे. ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला जीवन जगण्याचा अधिकार आहे, त्याच पद्धतीने तृतीयपंथीयांनाही अधिकार आहे. आपण जर तृतीयपंथीयांनाही समाजात स्थान दिले नाही, तर प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये फरकच काय राहील? तृतीयपंथींच्या भल्यासाठी जी कामे करावी लागतील, त्यासाठी मी उभा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here