कामगारांच्या कल्याणासाठी सदैव काम करनार : आमदार हसन मुश्रीफ

0

कागल ( प्रतिनिधी ) :
भाजप शासनाणे नोटबंदी आणि जीएसटी निर्णयाची अंमलबजावणी केल्यानंतर एक कोटी ३१ लाख कामगारांच्या नोकऱ्या गेल्या. सर्व क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम झाला. बांधकाम क्षेत्रामध्ये मोठी मंदी आली. परिणामी बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शासनाच्या विरोधामध्ये अनेक घटक असमाधानी आहेत. मात्र आमची सत्ता आल्यानंतर तालुक्यातील गट-तट न पाहता कामगारांच्या कल्याणासाठी काम करू त्यांच्या पाठीमागे हिमालयाप्रमाणे उभे राहून कामगारांना मासिक पाच हजार रुपये देऊ. अशी ग्वाही आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली.
पंचायत समितीच्या सभागृहांमध्ये इमारत बांधकाम कामगार नोंदणी ओळखपत्र वितरण समारंभामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती राजश्री माने होत्या. याप्रसंगी कामगार नेते कॉ. शिवाजीराव मगदूम गटशिक्षणअधिकारी गणपती कमळकर, माजी उपसभापती रमेश तोडकर, राजेंद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मुश्रीफ म्हणाले, मी कामगारमंत्री असताना कामगार विषयक कायद्याचा अंमल राज्यामध्ये सुरु केला. त्यासाठी निधीही उपलब्ध झाला. त्यावेळी सुमारे पाच हजार कोटींची निधी शिल्लक होता. आज तो दहा हजार कोटींच्या घरात गेला आहे. सध्या तो निधी शासनाकडे पडून आहे मात्र त्याचे वाटप होत नाही. माझ्या मंत्रिपदाच्या काळामध्ये मी कामगारांसाठी २४ योजना मंजूर केल्या. मात्र भाजप शासनाने त्या बंद केल्या आहेत. आज कामगारांच्या हाताला काम नाही बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कामगारांची उपासमार होत आहे. त्यांच्यासह अनेक घटक शासनावर नाराज आहेत. शिवाय सध्या विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न हा भाजप शासनाचा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. त्यामुळे लोकांनी जागृत झाले पाहिजे. आमची सत्ता आल्यानंतर कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, असे त्यांनी सांगितले.
कॉ. शिवाजीराव मगदूम म्हणाले आमदार हसन मुश्रीफ कामगार मंत्री असताना २०११ मध्ये कामगार कल्याण मंडळाची स्थपना झाली. त्यांनी कामगारांच्या कल्याणासाठी अनेक योजना मंजूर करून त्याचा अंमलही केला. मात्र आज भाजपच्या सत्ताकाळात मध्ये त्या योजना बंद केले आहेत. आज कामगारांनी काढलेल्या मोर्च्यावर पोलिसांची दडपशाही सुरु आहे. अशा परिस्थितीत आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या कामगारांना कोणी वाली राहिला नाही. यासाठी कामगारांनी जागृत होऊन एकत्र आलं पाहिजे असे त्यांनी सांगितले.
यावेळी संतोष गायकवाड, माजी उपसभापती रमेश तोडकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कामगारांना नोंदणीचे ओळखपत्र वितरित करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा पंचायत समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सभापती राजश्री माने यांनी केले. आभार गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांनी मानले. कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य विश्वास कुराडे, अंजना सुतार, आर एस पाटील, राहुल महाडिक, सी. बी. पाटील यांच्यासह लाल बावटा संघटनेचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here