गवसे येथे हत्तीचा धुमाकूळ

0

आजरा : गवसे येथे शनिवारी रात्री चार हत्तीच्या कळपाने ‘सावरशेत’ नावाच्या शेतात धुमाकूळ घालून सुमारे दीड एकर क्षेत्रातील ऊस फस्त केला. यामध्ये सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
गणपती महादेव तेजम यांच्या एक एकरातील तर हणमंत विष्णू गुरव यांच्या अर्धा एकरातील ऊस पिकाचे हत्तींनी नुकसान केले. शनिवारी रात्री एकच्या सुमारास तीन मोठे हत्ती व एक पिल्लू असा कळप या उसात दाखल झाला. रात्री एक पासून रविवारी पहाटे साडेपाच वाजेपर्यंत हा कळप ऊस पिकाचे नुकसान करत होता. रोज शेताची राखण करायला जाणारे शेतकरी गावात कार्यक्रम असल्यामुळे शनिवारी गेले नव्हते. त्यामुळे रविवारी सकाळी हा प्रकार शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला. याची माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वनविभागाला दिली असून हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here