पायाच्या बोटात स्त्रिया जोडवे का घालतात ?

जोडवे घालण्याचे काही फायदे :

0

जोडवे हे भारताच्या सर्वच राज्यातील स्त्रियांमध्ये पायाच्या दुसऱ्या बोटात घातले जातात. आणि आजही अत्याधुनिक वातावरणात नवीन मुलगी तिलाही जोडवे घालण्याचे आवडत असते. हिंदी स्त्रिया ह्याला ‘बिचिया’ म्हणतात. तेलगू स्त्रिया ह्याला ‘मेटालू’ म्हणतात. मेत्ति तामिळ स्त्रिया म्हणतात. कलनगुरा असे कन्नड स्त्रिया म्हणतात. पण आश्चर्य असे आहे की, सर्वच भारतीय स्त्रिया जोडवे घालत असतात. तेव्हा ही परंपरा आपण समजून घ्यायला हवी. की, यात आणखी काही कारणे आहेत ज्यामुळे पूर्ण भारतीय स्त्रिया जोडवे घालत असतात.
१) जोडवे घालणे ही लग्न झाल्याची खून मानली जाते. किंवा काही मुली फॅशन म्हणून घालत असतात. पण अगोदरपासून लग्न झाल्यानंतर स्त्री जोडवे घालते. आणि ह्यात मुस्लिम स्त्रियाही जोडवे घालतात.
२) जोडवे हे मुखत्वे चांदीचे किंवा अल्युमिनियमचे असते. आणि ते पायाच्या दुसऱ्या बोटात घातले जाते ) जोडवे सोन्याचे का घातले जात नाही ते चांदीचे का असते ? असा प्रश्न बऱ्याच स्त्रियांना पडत असतो. त्याचे कारण असे आहे की, सोने हे लक्ष्मी देवीशी संबंधित आहे. तेव्हा लक्ष्मी देवीच्या आदराने किंवा भीतीने पुरातन काळापासून सोन्याचे जोडवे घालत नसतील. आणि लक्ष्मी ही समृद्धी ची देवता म्हटली जाते. म्हणून कदाचित… पायात सोने घालत नसतील. पण तुम्हाला सोन्याचे आवडत असेल तर तुम्ही सोन्याचे जोडवे घालू शकता.
जोडवे घालण्याचे काही फायदे :
१. ह्याच्यामुळे गर्भाची संवेदनशीलता वाढत असते. ह्याचे कारणे थोडी वेगवेगळी आहेत. अगोदर पुरुषसुद्धा जोडवे पायात घालायची कारण ह्यामुळे मर्दानी ताकद येत असते. आणि हे समागमासाठी उद्युक्त करण्यात महत्वाची भूमिका बजावत असते. स्त्रियांच्या पायात जोडवे दिसल्यावर समागमाच्या वेळी पुरुष खूप उत्तेजित होत असतात.
२. ह्यात असेही सांगतात की, जी स्नायूंची सिस्टम असते तिलाही ह्यामुळे फ़ायदा होत असतो. म्हणजे काही भागात दबाव पडत असल्यामुळे बॅलन्स व्हायला मदत होते.
३. आपले शरीराचे स्नायू, नाड्या आणि मांसपेशी ह्या एकमेकांना जोडलेले असतात मग ते पायापासून ते डोक्यातील मेंदूपर्यंत तेव्हा पायाचे बोटातील जोडव्यामुळे त्यात बॅलन्स होऊन समतोल होत होत असतो. प्राचीन आयुर्वेदिक औषध ऍक्युप्रेशर साठी त्याचा खूप उपयोग होतो.
४. आपला ‘प्राण’ हा पायाच्या बोटातून वर जात असतो. आणि एक नस ही ह्या बोटातून जाऊन गर्भाशयात जात असते तेव्हा त्यासाठी सुद्धा जोडव्याचा संबंध लग्न झाल्याशी मानतात.
५. ह्याचा संबंध मासिक पाळीशी येत असतो. जर स्त्रीने दोन्ही पायात जोडवे घातले तर मासिक पाळी नियमित येत असते.
६. चांदीमधून एनर्जी खूप चांगली वाहत असल्याने पृथ्वीवरील शक्ती ही चांदीच्या जोडव्याने शरीराला मिळून शरीराला उत्साहित करत असते.
७. स्त्रीची फर्टिलिटी ची क्षमता ह्या जोडव्याने वाढत असते. म्हणून आपल्याकडे लग्न झाल्यावर कंम्प्लसरी जोडवे घालायला लावतात.
८. चालण्याच्या वेळी हे व्हायब्रेट करत असल्याने शरीरात एनर्जी तयार होत असते.

काही स्त्रियांना जोडवे घालणे आवडत नसेल तर ? ह्याबाबत असे काहीच नाही की, जोडवे घालायलाच हवे. जर तुम्हाला जोडवे घालण्याने त्रास होत असेल तर घालू नका. कारण काही स्त्रिया ह्या एकदा जोडवे घातले तर खूप वर्षांनी जोडवे बघतात आणि ते खूप घट्ट बोटात गेले असते आणि त्यामुळे त्याचा त्रासही होत असतो. म्हणून जास्त घट्ट जोडवे घालू नका. फॅशन म्हणून घालत असाल तर चांगलेच आहे. त्यामुळे तुमचे नवरेही चांगले आकर्षित होतील. आणि दिसायलाही जोडवे खूप छान वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here