रायगड धाब्यावरील अनैतीक धंदयांना पाठबळ कोणाचे ? खासदार महाडिकांनी खुलासा करावा — नगराध्यक्ष राजे खान जमादार !

0

मुरगूड प्रतिनिधी :
कागल-कोल्हापूर महामार्गावर ‘ रायगड ‘नावाच्या धाब्यावर जे अनैतीक धंदे चालतात त्याला पाठबळ कोणाचे?याचा खुलासा खासदार धनंजय महाडिक यांनी करावा मग स्वतःला नंबर वन समजावे असा घणाघाती आरोप नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी मुरगूड येथे महिला मेळाव्यात बोलताना केला
मुरगूड नगरपरिषदेच्या वतीने आयोजित माहिला मेळाव्यात नगराध्यक्ष यांनी खासदार धनंजय महाडिक यांचा खरपूस समाचार घेतला ते म्हणाले , महाडिक हे कोल्हापूरात व्यापारी म्हणून आले आणि ब्रिटीशाप्रमाणे राज्यकर्ते बनले त्यांचे दोन नंबरचे धंदे सर्वांना ज्ञात आहे डिझेलमध्ये भेसळ करून फसवून पैसे उकळणाऱ्यांना व गुंडगिरीच्या जोरावर अनेकांचे संसार उध्वस्त केले , अनेकांचे कूंकू पुसण्याचे काम केले अशा खासदारांनी प्रासंजय मंडलिक यांच्यावर बोलावे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचाच प्रकार आहे त्यांनी आपल्या काळ्या धंदयाचा व कर्तुत्वावर बोलावे मगच प्रा . मंडलिकांच्यावर बोलावे . शिक्षण संस्थेद्वारे युवा पीढीला देशोधडीला लावण्याचेही कर्तृत्व महाडिकांचेच असेही ते म्हणाले .
या मेळाव्यात सौ . रेश्मा चौगले यांनी स्वागत केले प्रकल्य अधिकारी सुनिल पाटील यांनी प्रास्ताविक केले . या मेळाव्यास उपनगराध्यक्ष नामदेवराव मेंडके , नगरसेवक जयसिंग भोसले , दिपक शिंदे , मारुती कांबळे अक्षय शिंदे नगरसेविका सौ . हेमलता लोकरे , सौ . रंजना मंडलिक , सौ .वर्षाराणी मेंडके आदि उपस्थित होते . विजय मोरबाळे यांनी आभार मानले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here