राज्य कर्जबाजारी असतांना सरकारची मात्र फक्त जाहिरातबाजी – धनंजय मुंडे

0
Mumbai Feb. 11 :- NCP leader Dhananjay Munde address to media at NCP Bhavan in Mumbai. ( pic by Ravindra Zende )

राज्यावर 4 लाख 44 हजार कोटी रुपयांचे कर्ज असतांना कर्जमाफी साठी पैसा नसताना सरकार मात्र जाहिरातबाजीच्या नशेत धुंद असल्याची घणाघाती टिका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
‘तिजोरीत नाही आणा’ आणि म्हणे ‘जाहिरातीत सरकारला चांगले म्हणा’असा सरकारचा कारभार सुरू असल्याचा टोला ही त्यांनी लगावला आहे.विशेष प्रसिद्धी मोहिमे अंतर्गत प्रसिद्धीसाठी 27 कोटी रु खर्च करण्याच्या कालच्या शासन निर्णयावर प्रतिक्रिया देतांना ते म्हणाले की , राज्य कर्जबाजारी आहे. शेतक-यांना कर्जमाफीचा एक रु मिळाला नाही, विकास निधी ला 30% कट लावला जात आहे. जिल्ह्या – जिल्ह्याचा विकास निधी कपात करण्याचे फतवे काढले जात आहेत, नाशिकच्या रूग्णालयात इन्कुबलेटर मशीनअभावी बालकांचे मृत्यू होत आहेत. सरकारजवळ यासाठी पैसा नाही जाहिरातबाजीसाठी मात्र पैसा असल्याची टीका करतांना सरकारच्या या जाहिरातबाजीच्या कृतीच्या निषेध केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here