जिथे शरद पवार असतील तिथे राज ठाकरे पोहोचतात, दोघात गुफ्तगू होतं, मग भाषणाचं स्क्रिप्ट तयार होतं : विनोद तावडे

0

मुंबई : जिथे शरद पवार असतील, तिथे राज ठाकरे पोहोचतात, तिथे दोघांमध्ये गुफ्तगू होतं आणि त्यानंतर राज ठाकरेंच्या पुढच्या भाषणाची स्क्रिप्ट तयार होते, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. काल (सोमवार, 15 एप्रिल) सोलापूरमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला होता. त्यावर आज भाजपकडून विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विनोद तावडे म्हणाले की, काल रात्री राज ठाकरेंच्या टुरींग टॉकिजचा शो पाहिला. राज यांनी ते कोणत्या पक्षाचे स्टार प्रचारक हे आता जाहीर करावं. राज यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर न देता तावडे म्हणाले की, समज कमी असली की असे आरोप केले जातात.

राज यांच्या म्हणण्याप्रमाणे, जर आमच्या योजना फसलेल्या असतील तर ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, नगरपालिका, महानगरपालिका येथे होणारा भाजपचा विजय आणि मनसेचा गाशा गुंडाळला जाणं हे कशाचं प्रतीक आहे? असा सवालही तावडे यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here