स्वातंत्र्य इतिहासाची साक्ष असलेला काला चबुतरा कुठे आहे ? मनपास राजेंद्र दाते पाटील यांचा सवाल

0

राजू म्हस्के

औरंगाबाद मनपा क्षेत्रातील काला चबुतरा कुठे आहे ? असा परखड सवाल शहर विकासाचे अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी मनपा प्रशासन औरंगाबाद यांना विचारला असुन कालाचबुतरा या ऐतिहासिक स्थळ दाखवा याचा ते सातत्याने पाठपुरावा करीत आहे ही विशेष बाब होय.
काला चबुतरा कुठे आहे हा त्यांचा हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे. एवढा मोठा विषय असा अचानक प्रशासनास सोडून देता येणार नाही कारण हा स्वातंत्र्य सैनिकांना फाशी दिलेल्या स्थळास काला चबुतरा हे नाव होते व ती वास्तु चा आहे असे प्रतिपादन त्यांनी केले असुन अचानक काला चबुतरा वास्तु हरवली कि गहाळ झाली कि नष्ट करण्यात आली ? हे सगळ्याना माहीती व्हावी हे मात्र नक्की असल्याचे ते म्हणाले आहे. या कार्यक्रमाचे संयोजक म्हणतात कि, ज्या जागेवर फाशी तथा मृत्यूदंड देण्यात आला ती स्मारकाची जागा या स्मारकाच्या बाजूला आहे ? हे जर खरे मानले तर मग ती वास्तु कुठे आहे ती जनतेला का दाखवली जात नाही ? ही बाब राजेंद्र दाते पाटील यांनी सातत्याने मांडली आहे व अगदी लेखी मागणी सुद्धा मनपा आयुक्त औरंगाबाद यांना त्यांनी केली आहे पण आज तागायत त्याचे उत्तर दिल्या गेले नाही हे असे का ? हा सवाल उपस्थितीत करून ते म्हणाले कि आमच्या २४ स्वातंत्र्य सेनानीना फाशी दिल्या गेली या मध्ये मिर फिदा अली, मोदीखान,शैख रहीम , जाबाज खान,महोम्म्द मिर्झाखान,शैख फते महोम्म्द, महोम्म्दसालेर,दिलावरखान, शैख हुसैन,मिर्झा अजीम बैग, हुसेनखान , शैख मलिक, अहेमद खान,मीर मजहर, अली खान,नूरखान,मीर इनाम अली, अब्दुल्ला खान,महोम्म्द मीर खान,मीर बदर अली,फैझ महोम्म्द आदींचा समावेश होता.इंग्रजांनी २१ जून१८५७ ला पायदळातील२४ वी तुकडी आली होती हा झाला इतिहास. पण तो असा मिटवण्याचा अधिकार कोणी मनपास कोणी दिला ? असे काही आहे काय ते तरी सांगा? अगदी दुर्दैवी बाब असल्याचे प्रतिपादन केले असुन त्यांनी मागणी केली आहे कि,दाखवा कुठे आहे आमचा तो ऐतिहासिक ठेवा ? नष्ट झाला कि हरवला ? कि गहाळ झाला ?मनपा आयुक्त महोदयांनी या वर भाष्य करावे या गंभीर बाबीवर काही कारवाई करणार आहेकाय असे विचारुन त्यांनी मागणी केली कि दोषीवर गुन्हे दाखल करून
इतिहास प्रेमीना न्याय द्यावा असे एक ना अनेक प्रश्न शहर विकासाचे अभ्यासक
राजेंद्र दाते पाटील मनपा प्रशासना समोर उपस्थित केले आहे.सदर प्रकरण न्यायालया पर्यंत जाण्याची चर्चा सर्व दूर पसरली असुन सर्वसामान्य जनता हवाल दिल झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here