मराठीला अभिजात दर्जा कधी मिळणार – जयंत पाटील यांचा सरकारला सवाल

0

मुंबई – शिक्षणमंत्र्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याचे आश्वासक विधान केले. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेणार असल्याचे सांगून सहा महिने उलटले परंतु अदयाप मराठीला अभिजात दर्जा मिळालेला नाही. सरकारने काय प्रयत्न केले, दिल्ली विदयापीठाने मराठी भाषेत घेतलेल्या परिक्षेत विदयार्थ्यांचे कमी गुण केले आहे याचा जाब विचारला गेला का? हे सभागृहाला सांगावे अशी मागणी विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते जयंत पाटील यांनी आज केली.

आज २०१८-१९ च्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर चर्चेत भाग घेताना भाषणात त्यांनी ही मागणी केली.

महाराष्ट्रातील लुप्त होत चाललेल्या लोककला आणि वाद्यांच्या संवर्धनासाठी ७५ लाखाची तरतुद सरकारने मागील अर्थसंकल्पात केली होती.  सन २०१४-१५ मध्ये सरकारने यावर कसा खर्च केला आहे. माझ्या माहितीनुसार शासनाकडून जवळजवळ २० लाख रुपये उधळले गेले आहेत. हा निधी मार्गी लागला की नाही याचा हिशोब सरकारला दयावा असेही जयंत पाटील म्हणाले.

बॉम्बे हायकोर्टाचे नाव बदलले जात नाही. मुंबई हायकोर्ट असे केले जात नाही. शिवसेना मात्र त्याबाबत ‘ब्र’ ही काढत नाही असा टोला सेनेला लगावला.

२ लाख अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे पैसे बाकी आहे सरकारने ते पैसे दिले नाही. पुण्याचे सिंहगड इन्स्टिट्यूट त्यामुळे बंद करण्याची वेळ आली आहे. यामध्ये दिरंगाई का झाली. झारीतील शुक्राचार्य कोण आहे याची चौकशी करावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

जलसंधारण विभागात मोठा गैरव्यवहार होत आहे. या खात्याच्या कामाला जर गती द्यायची असेल आणि दिशा दयायची असेल तर ज्या तक्रारी येतात त्याचे योग्य निवारण करणे गरजेचे आहे.

नवनाथांपैकी एका नाथाचे मंदिर माझ्या मतदारसंघात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होण्याआधी खासदार असताना किल्ले मच्छिंद्र गडावर आले होते. या परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे थोडा निधी कमी पडतोय मंत्री महोदयांनी त्याला निधी द्यावा अशी मागणी केली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here