सरकारने शेतकऱ्यांना संपवण्याचा विडाच उचललाय काय..? – अशोक चव्हाण

0

पालघर-योगेश चांदेकर

सरकारची अनास्था आणि भूमिका पाहिली तर जणू शेतकऱ्यांना संपवण्याचा वीडाच उचललाय  काय..? अशी टिका करत कर्ज माफ़ी ही फसवी असून राज्यात शेतकऱ्यांचे आत्महत्या रोखण्यास सरकार अपयशी ठरले असल्याची टीका  अशोक चव्हाण यांनी केली. ते पालघर येथे व्हिजन 2019 काँग्रेस कार्यकर्ता शिबिराच्या  शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

अशोक चव्हाण यांनी बोलताना हे सरकार जातीय तेढ निर्माण करून मतांचे राजकारण करीत असल्याचे सांगत सर्व सामान्याना वेठीस धरले आहे यामध्ये वाढती महागाई, इंधन  दरवाढ अशा  अनेक समस्यांना सामोरे जावे  लागत आहे. अच्छे दिनच्या नावाखाली सरकारने मनकी बातच्या माध्यमातून देशातील जनतेचा विश्वास घात केला आहे अशी जहरी टिका चव्हाण यांनी यावेळी केली. येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता व्हिजन 2019 च्या माध्यामातुन प्रत्येक  जिल्ह्यात अशी शिबिरे घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपा सरकारकडुन घोषणांची खैरात वाटली जात असली तरी मात्र कामगिरी शून्य असल्याचा आरोप यावेळी चव्हाण यांनी केला. तर हे सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम करित आहे. २९ हजार … शेतकऱ्यांना कर्ज माफी झाली असल्याचा दावा करणारे सरकारने शेतकऱ्यांच्या हातात मात्र प्रत्यक्ष काही दिले नसून हे सरकार निराशाच पदरी देणारे ठरले आहे, इतकेच नाही तर भाजपाचे खासदार हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या पॅशन झाल्याचे व्यक्तव्य करित असल्याचे दिसून येत आहे याचाच अर्थ असा की “खोट बोल पण रेटुन बोल” अशा प्रकारे हे सरकार काम करित आहे असेही ते म्हणाले.

या शिबिरास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण माझी शिक्षण मंत्री वसंत पुरके,काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश,खासदार हुसैन दलवाई,माजी राज्यमंत्री राजेंद्र गावीत,महिला प्रदेशाध्यक्ष चारुताई टोकस,जिल्हाध्यक्ष केदार काळे,सर्व जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष,पदाधिकारी,व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला यावेळी पालघर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here