व्यक्तिमत्वाचा शोध म्हणजे काय?

0

प्रा. सुष्मा पाटील (गडहिंग्लज)- ‘ चेहरा’ हा मानवी मनाचा आरसा असतो. आपल्या मनात एखादा चेहरा ठसतो. मग तो नेहमी लक्षात राहतो. मग काय असतं त्या चेहऱ्यात? हमेशा दिसणाऱ्या चेहऱ्यापैकी काही खास असावं त्या चेहऱ्यात पण त्या व्यक्तित्वाचा शोध घ्यावा असे आपल्याला वाटत असतं.
आपण सुंदर, मुलायम कपड्यात आपलं शरीर घालतो, तेंव्हा आपल्यामुळे, आपल्या शरीरामुळे आपले कपडे सुंदर दिसतात की रंगीत फुलफुलांच्या इस्त्री केलेल्या कपड्यामुळे आपलं शरीर सुंदर दिसत? नाही ना…सांगता येत? नाहीच सांगता येणार..
व्यक्तित्वाचे २ महत्वाचे कप्पे असले पाहिजेत. एक आंतरिक व एक बाह्य. असे आपण पाहतो जे सुंदर कपड्यांनी उजळत ते नाक, कान, डोळे व सुंदर त्वचेचं बाह्य व्यक्तिमत्व.
‘व्यक्तित्वाचा’ शोध घेण्याआधी व्यक्तित्वाच्या चेहऱ्यावर जाण्यापेक्षा व्यक्तित्वाच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल कारण चेहऱ्याच्या सुंदरतेहून मनाची सुंदरता खूप सुंदर असते. शेकडो लोकांमधून आपल्या मनात पाठलाग करीत आलेला तो चेहरा. त्या चेहऱ्यात काय होत स्पेशल? नुसताच बाह्य देखणेपण की चपळपानाची बाहेर आलेली झळाळी! हे सगळं भिडत, जाणवत, जे पाठलाग करीत मानाबरोबर घरी येत तेच खरे व्यक्तिमत्त्व.
शिकागोचया जागतिक धर्मपरिषदेत ऐटबाज निळ्या सुटचा आणि चॉकलेटी बुटांच्या लाल गोऱ्या विद्वानांमध्ये त्यांनी आपल्या भगव्या फेट्यात, भगवी लुंगी आणि सदऱ्याने बर्फाला आग लावली ते कशाच्या जोरावर? वाचन, चिंतन, शरीरसाधन, समृद्ध चारित्र्याच्या रासायणाने तयार झालेल्या व्यक्तिमत्वाच्या जोरावर. हा तेजोमय स्वामी विवेकानंदच्या सारखा तरुण आजरामर ठरला. आपले ध्येय केवळ सुख, समृद्धी देणारी नोकरी एवढेच क्षुद्र असून चालणार नाही पण त्या पलीकडील अमूल्य, कधीच न हारावणारे असे ही काही जगात आहे हे समजून घेणारे मन हेच आपले धन आहे.
कुठेतरी कस्तुरीमृग असावा पण त्याने सारे रान दरावळून टाकावे तशी काही व्यक्तिमत्व अवघे जग सुगंधी करतात.खर तर तलवारीच्या बळावर राज्य जिंकणाऱ्या हूकुंमशहापेक्षा अशी समृद्ध व्यक्तिमत्वाच्या बळावर हृदय जिंकणारी व्यक्तीतत्व निर्मित्याचा आनंद त्या परमेश्वराला होत असतो. आपण अस पृथ्वीवरील व्यक्तीत्वपैकी एक व्हावं, आपण जन्माला येताना सारे अवयव घेऊन येतो पण आंतरिक व्यक्तित्वसाठी अहोरात्र प्रयत्न करावे लागतात. ज्या प्रमाणे सुखा रवा, सुखी साखर असावी पण त्याला आपण रव्याचे लाडू म्हणू शकत नाही त्या साठी रवा तापत्या तव्यात खुप भाजावा लागतो तसच व्यक्तिमत्व घडवण्यासाठी येणाऱ्या समस्या, अडचणी या वर मात करून चांगल्या विचाराने अंतःकरण स्वछ करावे लागते.
जॉर्ज ब्रँड शॉ, अब्राहम लिंकन यांच्याकडे शाररिक कुरूपपणा असला तरी त्यांनी बौध्दिकतेच्या जोरावर असामान्य नेतृत्व करून बाह्य व्यक्तिमत्वावर मात केली.
सुप्रसिद्ध विचारवंत दादा धर्माधिकारी यांनी म्हटले आहे की परमेश्वराला अपेक्षित असलेले कार्य आधीच्या पिढीकडून घडत नाही तेंव्हा हे विश्व सुंदर करण्यासाठी परमेश्वर नवी पिढी जन्माला घालते, आपण मनुष्य योनीत का जन्माला आलो आहोत, माझ्याकडून विध्यालाला काय अपेक्षित आहे याचा शोध घेणं म्हणजेच आपल्या व्यक्तित्वाचा शोध घेणे होय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here