अनगरच्या युवा शेतकऱ्यास लोककल्याण पुरस्कार

0

महेश गोडगे

तालुक्यातील अनगर येथील प्रयोगशील युवा शेतकरी आप्पा कारमकर यांना राजवीणा लक्ष्मी ट्रस्ट पुणे यांच्या वतीने दिला जाणारा लोककल्याण साधना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सेंद्रिय शेतीमध्ये त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान या पुरस्काराने झाला आहे.मराठी साहित्य परिषद पुणे येथे झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस (लीगल सेल)चे अध्यक्ष ॲड. भगवानराव साळुंके व पुणे मनपाच्या नगरसेविका आरती कोंढरे यांच्या हस्ते कारमकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ट्रस्टच्या अध्यक्षा विनाताई नितनवरे, श्वेता प्रभुदेसाई, धीरुभाई कल्याणजी (पुणे), ब्रम्हदेव सरडे (करमाळा), अनिल शिंदे, बाळासाहेब गुंड (अनगर) आदी उपस्थित होते.कारमकर यांनी आजवर आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय शेतीचे अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. प्रामुख्याने शेवगा, मिरची, झेंडू या पिकांवर त्यांनी विविध प्रयोग करून भरघोस उत्पन्न मिळविले आहे. यापूर्वी त्यांना स्वामी समर्थ ट्रस्ट नाशिक, डॉ. शंकरराव चव्हाण ट्रस्ट व दामाजी एक्सप्रेस यांच्या वतीने कृषिरत्न पुरस्कार मिळाले आहेत. युवा शेतकऱ्याच्या ह्या सन्मानाने, इतर युवा शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी सेंद्रिय शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here