सॅनिटरी पॅड जीएसटी मुक्त करा- राष्ट्रवादी महिला काँग्रेस

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा हल्लाबोल

0

प्रतिनिधी : पुनम पोळ

ठाणे : सॅनिटरी पॅडवर केंद्र सरकारने 12 टक्के जीएसटी लावला असून तो कर मागे घ्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ॠता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हल्लाबोल आंदोलन केले.

देशात जीएसटीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जीएसटी आकारताना बांगड्या, कुंकू यासारख्या स्त्रीयांच्या जिव्हाळ्याच्या वस्तूंवर जीएसटी दर शून्य टक्के ठेवण्यात आला आहे. मात्र स्त्रियांचं आरोग्य, स्वच्छता आणि सोय यासाठी अतिमहत्त्वाच्या असलेल्या सॅनिटरी पॅडसवर जीएसटी परिषदेने 12 टक्के कर लावला आहे.

सॅनिटरी पॅडवरील जीएसटी रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. जीएसटीचे अतिरिक्त आयुक्तांना निवेदन देत सॅनेटरी पॅड जीएसटीमुक्त करण्याचे निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here