विरोधी पक्ष नेत्यांच्या पुत्राचे बंड?

0

अहमदनगर (प्रतिनिधी) :
नगर दक्षिण मतदारसंघातून मला लोकसभा निवडणूक लढवायची आहे. कॉंग्रेसने मला उमेदवारी दिली नाही तरीही मी लोकसभा निवडणूक लढवणारच आहे. मला पक्ष निवडण्याचा अधिकार आहे,असे सांगत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ.सुजय विखे यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे.

माझे वडील कॉंग्रेसचे नेते आणि आई कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्ष असल्या तरी मला पक्ष निवडीचा अधिकार आहे, असे सूचक विधान करून सुजय यांनी भाजप प्रवेशाचे सुतोवाच केल्याचेही बोलले जाते.

 

राहता येथे निळवंडे धरणाबाबत सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने रास्ता रोको आंदोलन केले यावेळी सुजय विखे म्हणाले की, ज्या पक्षाचे विचार मला पटतील त्या पक्षाचा मी विचार करू शकतो. सुजय विखे यांनी नगर दक्षिणेतून लोकसभा निवडणूक लढवण्याचे वारंवार सूचित केले आहे. कॉंग्रेसने तिकीट नाकारल्यास ते भाजपकडून लढतील, असेही बोलले जाते. राहुरीतील भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी त्यांना अनेकदा भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे. सुजय यांनी आतापर्यंत संदिग्ध प्रतिक्रिया दिली होती. गुरुवारी ते प्रथमच स्पष्ट बोलले.

राधाकृष्ण विखे पाटील आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील संबंध अत्यंत सलोख्याचे आहेत. याचाही फायदा त्यांना होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here