शिक्षणमंत्री विनोद तावंडेवर फेकले निषेधाचे पॅम्पलेट आणि भंडारा..

विद्यापीठाला अहिल्यादेवींचे नाव द्यावे या मागणीसाठी केला निषेध..   भर कार्यक्रमात भाषण सुरु असताना केला निषेध

0

सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी धनगर समाजाचे कार्यकर्ते हुतात्मा स्मृती मंदिरात सुरू असलेल्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात व्यासपीठावर घुसले आणि त्यांनी तावडे यांच्या अंगावर भंडारा उधळला आणि नामांतराचे निवेदन भिरकावले तसेच येळकोट येळकोट जय मल्हारच्या घोषणा दिल्या. दरम्यान चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेय. दरम्यान आज लिंगायत समाजाच्या वतीने देखिल महात्मा बसवेश्वरांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्याच्या मागणी साठी भव्य मोर्चा काढला आहे . आजच्या या प्रकारामुळे विद्यापीठ नामांतर प्रश्न चिघळण्याचे चित्र निर्माण झाला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here