विजय देवणे व सुनील शिंत्रे यांची महामंडळाच्या सदस्यपदी निवड

0

 

मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी शिवसेनेने पक्षाच्या कार्यकर्त्यांना राज्यातील विविध महामंडळांची सदस्यपदं बहाल केली आहेत. पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांना खूश केले आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या शैलेश फणसे, भाऊ कोरगांवकर, अरुण दुधवडकर, नामदेव भगत, गोपाळ लांडगेंसह युवासेनेच्या पवन जाधव आणि अनेक महिला कार्यकर्त्यांना सदस्यपदं देण्यात आली आहेत.यामध्ये कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे व चंदगड विधानसभा सहसंपर्क प्रमुख सुनिल शिंत्रे यांची ही निवड करण्यात आली आहे.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह, युवासेनेच्या कार्यकर्त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्गिय वित्त आणि विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ मर्यादित, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि इतर अनेक महामंडळांवर शिवसैनिकांची आणि पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here