अखेर या पक्षांचा ३८-३८ चा फॉर्म्युला निश्चित

0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशातील राजकीय संपूर्ण बदलली आहेत. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची महाआघाडी झाली असून प्रत्येकी ३८ जागांवर लढणार आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांनी एकत्रित पत्रकार घेऊन जागावाटप आणि आघाडीची घोषणा केली.

रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदार संघातून उमेदवार दिला जाणार नाही. या लोकसभा मतदारसंघाचे अनुक्रमे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रतिनिधीत्व करत आहेत. उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा हे तुल्यबळ पक्ष एकत्र आल्याने सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसला हादरा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रस्तावित आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याने सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी हा जबर हादरा मानला जात आहे. २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशने ‘भक्कम’ साथ दिल्यानेच भाजपला सत्तेचा सोपान गाठण्यात यश आले. या संभाव्य घडामोडींमुळे मोदींनी पुर्वोत्तर राज्यांकडे मोर्चा वळविण्यास सुरुवात केली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना थेट आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here