कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक

0

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला आफ्रिकेतील सेनेगलमध्ये अटक करण्यात आली आहे. भारतीय यंत्रणांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी ही कारवाई केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. रवी पुजारीला 22 जानेवारीला अटक केल्यानंतर 26 जानेवारीला भारतीय दूतावासाला अटकेबाबतची माहिती मिळाली.
त्यानंतर आता पुजारीला भारतात आणले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या अनेक दशकापासून फरार असलेल्या रवी पुजारीवर खंडणी, अपहरण, खून, ब्लॅकमेलिंग आणि फसवणुकीचे आरोप आहेत. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली आहे.
भारतीय गुप्तचर यंत्रणा रवी पुजारीवर मागील काही दिवसांपासून लक्ष ठेऊन होती. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. नुकतेच ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील आरोपी राजीव सक्सेना आणि मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी दिपक तलवार यांना भारतात आणण्यात आलं आहे. दोघांनाही ईडीने ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here