गडहिंग्लजच्या उपनगराध्यक्षपदी उदय पाटील बिनविरोध

0

गडहिंग्लज नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी उदय पाटील बिनविरोध निवड करण्यात आली. पिठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा स्वाती कोरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत ही निवड झाली. यावेळी मुख्याधिकारी सुषमा कोले उपस्थित होत्या.

नितिन देसाई यांनी २६ डिसेंबर रोजी राजीनामा दिला होता. त्यामुळे उपनगराध्यक्ष पद रिक्त होते. आज (मंगळवार) दुपारी बाराच्या सुमारास निवडीसाठी विशेष सभा बोलविण्यात आली होती. उपनगराध्यक्षपदासाठी एकच अर्ज आला होता. सूचक क्रांतिदेवी शिवने, अनुमोदक सुनीता पाटील होत्या. एकच अर्ज आल्यामुळे उदय पाटील यांची निवड बिनविरोध झाल्याचे पीठासन  अधिकारी स्वाती कोरी यांनी घोषित केले. नूतन उपनगराध्यक्ष उदय पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला.

यावेळी श्रीपतरावजी शिंदे, बाळेश नाईक, महेश कोरी यांच्यासह सर्व नगरसेवक, डॉ. एम.एस.बेळगुद्री, अरुण बेळगुद्री, व्ही.एस.पाटील, जगदीश पट्टणशेट्टी, राहुल पाटील, युवराज बरगे, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here