दोनशे कार्यकर्त्यांचा विक्रमसिंह घाटगे गटात प्रवेश

0

वार्ताहर व्हनाळी :बेलवळे खुर्द (ता. कागल) येथील मुळचे स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे गटाचे जुने कार्यकर्ते आनंद माणूक पाटील व त्याची दोन्ही सुपुत्र मारुती आणि विजय पाटील यांनी आपल्या २०० कार्यकर्त्यासह आपल्या मूळ स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी घाटगे गटाचे प्रमुख पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
यावेळी समरजित घाटगे म्हणाले, स्वर्गीय विक्रमसिंह यांचा पुतळा सभासदांच्या मागणीनुसार श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन कागल येथे उभारण्यात येत आहे. योगायोगाने यांच्या पुतळ्याच्या भूमीपूजन समारंभाच्या पूर्वसंध्येला हा प्रवेश होतोय. कदाचित तुम्ही स्वगृही परतावे ही विक्रमसिंह घाटगेयांची मनापासून इच्छा असावी. त्यामुळेच योगायोगाने इतके दिवस थांबलेला प्रवेश आज दिमाखात झाला.
दरम्यान मारुती पाटील, दत्त पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी चंद्रकांत ज्योतीराम पाटील, वसंत ईश्वर पाटील, वसंत गणपती पाटील, यशवंत पाटील, बाळासो गणपती पाटील, रंगराव पाटील, संजय पाटील, विष्णू पाटील गुरुजी, रणजित पाटील गुरुजी, सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, सर्व शाहू दूध संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह पांडुरंग वाईंगडे, जयवंत बापू पाटील, चेअरमन शाहू दूध संस्था यांचेसह जवळपास २०० हुन अधिक कार्यकर्त्यांनी स्व. राजे गटात प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here