ट्रम्प यांचे सत्तेवर येणे ही सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विखारी प्रचाराचेच फलित: पत्रकार निळू दामले

0

ट्रम्प यांचे सत्तेवर येणे ही सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विखारी प्रचाराचेच फलित: पत्रकार निळू दामले
मुरगुड प्रतिनिधी
समजूतदारपणा आणि तणाव यांच्यात एक प्रकारचा तोल सांभाळला जात असतो तो जोपर्यंत व्यवस्थित सांभाळला जातो तोपर्यंत समाज सुरळीत असतो.तो तोल बिघडला की सामाजिक अस्वस्थता निर्माण होते.असे भारतासह जगभर दिसून येत आहे.अशावेळी काही माध्यमे,चळवळी आणि समाजवादी प्रबोधिनीसारख्या संस्था सामाजिक ऐक्याचा विचार रुजविण्याचे जे काम करतात ते फार महत्वाचे आहे.असे मत ज्येष्ठ लेखक व नामवंत पत्रकार निळू दामले यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित व्यख्यानात “राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाची सद्यस्थिती ” या विषयावर बोलत जाते.अशोक केसरकर यांनी प्रस्ताविक केले.दयानंद लिपारे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.बापूसाहेब भोसले यांच्या हस्ते ग्रंथभेट देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
निळू दामले म्हणाले,भारत,केनिया,मॅनमार, अफगाणिस्तान, सीरिया आदी देशात गेल्या काही वर्षात जात-धर्म या आधारावर सांस्कृतिक राजकारण करणारे घटक वरचढ होताना दिसत आहेत.”आम्ही-आमचं”च्या भाषेऐवजी”मी – माझं ” चा जोर वाढत चालल्याने काही गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत.कारण सांस्कृतिक राष्ट्रवाद समता मानतच नाही.ऐक्याला तडे देणारी जातीय व धर्मधारीत आंदोलने वाढत जाणे नेहमीच सांस्कृतिक राष्ट्रवादाला व दहशतवादाला खतपाणी घालत असतात.अमेरिकेत ट्रम्प यांचे सत्तेवर येणेही सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विखारी प्रचाराचेच फलित आहे .अर्थात अशा भूमिकांना समाजात कायमस्वरूपी थारा मिळत नसतो.पण त्यामुळे दीर्घकालीन नुकसान मात्र मोठे होत असते. अशावेळी आपण सर्वांनी सजग राहण्याची गरज आहे.नव्या पिढीतील एका मोठया गटाला समतेपासून पर्यावरणाच्या प्रश्नांपर्यंतचे व्यापक जागतिक भान आले आहे हे अस्वस्थ वर्तमानातील एक आशादायी चित्र आहे.निळू दामले यांनी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत या विषयाची सर्वांगाने मांडणी केली.यावेळी पांडुरंग पिसे,अन्वर पटेल,शिवाजी शिंदे,नौशाद शेडबाळे,सौरभ मोरे,मनोहर जोशी, प्रेमजीत बत्ते,सचीन पाटोळे,शंकर भम्बिष्टे,भूषण डिंगणे,सोमेश गुरव,मनोहर मुदगल,सागर माळी, नारायण लोटके,देवदत्त कुंभार,प्रवीण शिंदे,राजू झळके,शकील मुल्ला,अक्षय कांबळे,मंजूनाथ पाटील,वसंत पुजारी,आनंदा जाधव,बाळकृष्ण म्हेत्रे
यांच्यासह अनेकांची उपस्थिती होतो.प्रा.रमेश लवटे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here