पंढरपूरला जाताना ट्रक-दुचाकी अपघात; कोल्हापूरचे दोन तरुण ठार

0

कोल्हापूर : मिरज- पंढरपूर रोडवर तासगाव फाट्यानजीक रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला पाठीमागून दुचाकीची धडक बसल्याने दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील भैरीनाथ बाबुराव मेटील ( वय 37 ) व मोहन हिंदुराव बोटे (वय 40) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. पंढरपूरला जात असताना मंगळवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

एकादशी असल्याने मोहन बोटे व भैरीनाथ मेटील हे दोघे तरुण भैरीनाथ यांची दुचाकीवरून सायंकाळी सातच्या दरम्यान गावातून पंढरपूरकडे निघाले होते. यावेळी मिरज-पंढरपूर रस्त्यावर तासगाव फाट्यानजीक रात्री बाराच्या दरम्यान रस्त्यावर लावलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक बसली. दोघांच्याही डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही सामान्य कुटुंबातील असल्याने व एकाच गल्लीतील असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here