माकुणसार येथे ८० ते ९० लग्नाच्या जेवणातून विषबाधा

0

पालघर-योगेश चांदेकर

पालघर तालुक्यातील माकुणसार येथील एका  लग्न समारंभात  भोजनानंतर ८० ते  ९० जणांना  अन्नातून विषबाधा झाली असून या सर्वांना विविध रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आले आहे.

     माकुणसार येथील विवेक बाळकृष्ण वर्तक यांच्या घरी लग्न होते, या लग्नात आज दुपारी जवळपास तीनशेहून अधिक वऱ्हाडी आणि  नातेवाईकांना पनीर व गाजर हलवा या पदार्थातून  ही विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

    पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात ३५ ते ४० तसेच सफाला ग्रामीण रुग्णालयात ४० ते ४५  व माहीमच्या

प्राथमिक आरोग्य केन्द्रात १० ते २५ रुग्ण असून, धवळे मेमोरियल हॉस्पिटल मध्ये काही रुग्णांना  दाखल केल्याचे सांगण्यात आले.

येथील रुग्णालयात  डॉक्टरांची  कमतरता असल्याने उपचार करण्यास प्रचंड  धावपळ उडाली आहे. पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दखल असलेल्या रुग्णांची  प्रकृति नियंत्रणात  असल्याचे अधीक्षक डॉ दिनकर गावित यानी सांगितले तर एक लहान मुलगा सीरियस असून त्याला अन्यत्र खाजगी किवा मुंबईला हलवावे लागण्याची  शक्यता असल्याचे सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here