हलकर्णीत उद्या हणबर समाजाचा भव्य मेळावा

0

हलकर्णी वार्ताहर : समाजाला एकसंघ ठेवणे व समाजाचे प्रलंबीत प्रश्न सोडवून पुढील दिशा ठरविण्यासाठी हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे उद्या रविवारी हणबर गवळी समाजाचा मेळावा हलकर्णी भाग हायस्कूलच्या मैदानावर होत आहे. समाजरत्न गंगाधर व्ह्सकोटी यांनी या जागर मेळाव्याचे आयोजन केले आहे. यात कर्नाटकासह कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील समाजातील कार्यकर्ते उपस्थित राहून समाजाला संबोधित करणार आहेत. युवकांना रोजगार मार्गदर्शन समाज बांधणी प्रशासन दरबारी समाजाचे प्रलंबित प्रश्न तसेच समाजाला दिशा देणे हा या मेळाव्याचा हेतू आहे. सुक्षेत्र करीमठाचे मठाधिपती प. पू. गुरुसिध्देश्वर महास्वामीजी यांच्या पावन सानिध्यात हा मेळावा होणार असून यात जिल्ह्यासह सांगली, मुंबई, बेळगाव, बैलहोंगल, हुक्केरी, चिक्कोडी, गोकाक येथील समाजाचे सक्रिय कार्यकर्ते मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याची माहिती व जागृतीसाठी भागात समाजातील युवकांनी मोटारसायकल रॅलीही काढली आहे. तर भागात जोरकस पोष्टरबाजीही करण्यात आली आहे. समाजातील महिला युवक व ज्येष्ठांनी यात मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here