सावत्र बापाचा तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार

पुण्यात नराधमाचा तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार

0

पुणे : पुण्यातल्या कर्वेनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. तीन वर्षाच्या मुलीवर तिच्या सावत्र वडिलानेच बलात्कार केला आहे. पत्नीला मारहाण करुन रात्रीच्या वेळेस तो नराधम तीन वर्षाच्या मुलीला घेवून घरातून बाहेर गेला.. तासाभरानंतर त्या मुलीला घेवून परत आला. त्यावेळी त्या मुलीच्या अंगावर ओरखडे होते आणि वेगवेगळ्या बागातून रक्त येत असल्याचे तिच्या आईला दिसले. त्यावेळी त्याचा जाब तिने आपल्या पतीला विचारला असता पुन्हा त्याने तिला मारहाण केली. आपल्या मुलीवर अत्याचार झाल्याचे लक्षात येताच त्या महिलेने मुलीला घेवून कर्वेनगर पोलिस स्टेशन गाठले आणि याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी पिढीत मुलीला ससून रुग्नालयात भर्ती करुन आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यानंतर आज आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here