महाराष्ट्रातील तीन पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा

0

नवी दिल्ली : राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ४९ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये ३ पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक, ७ जणांना पोलीस शौर्यपदक तर ३९ जणांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर केली जातात. यावर्षी यातंर्गत १०७ पोलीसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी), ७५ पोलिसांना उत्कृष्ट सेवा ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएमडीएस ) आणि ६१३ पोलिसांना ‘पोलीस पदक’ (पीएमएमएस) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या एकूण ४९ पदकांचा समावेश आहे.
राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये प्रशिक्षण आणि विशेष विभाग, मुंबईचे अतिरीक्त महासंचालक श्री. एस जगन्नाथ, वागळे इस्टेट ठाणेचे सहायक पोलीस आयुक्त श्री. बाजीराव भोसले आणि नंदुरबार येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उपनिरीक्षक श्री. विनायक राजपूत यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here