महिलांमध्ये थायरॉईडचं प्रमाण सर्वाधिक

पुरुषांच्या तुलनेत महिलांना थायरॉईड होण्याची शक्यता 80% पेक्षा जास्त

0

महिलांमध्ये आयोडिनची कमतरता असण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यामुळे महिलांमध्ये थायरॉईडचं प्रमाण जास्त असतं.डॉक्टरांच्या माहितीनुसार, “शरीरातील पचनक्रिया समतोल राखण्याचं महत्त्वपूर्ण काम थायरॉईड ग्रंथी करते. यामधून स्रवणारं हार्मोन शरीराचं तापमान समतोल राखण्याचं, मेंदू तंदुरुस्त ठेवण्याचं, हृदयाची क्रिया सुरळीत ठेवण्याचं कार्य करतं.थायरॉईड होणं म्हणजे नेमकं काय? थायरॉईड ग्रंथीने तिच्या कार्यापेक्षा जास्त काम केल्यास हायपरथायरॉईड होतो. तर ह्या ग्रंथीने तिच्या कार्यापेक्षा कमी केल्यास हायपोथायरॉईड होतो. लोकांमध्ये हायपोथायरॉईडचं प्रमाण जास्त असतं, जे कोलेस्ट्रॉल आणि हृदयाविकारला कारणीभूत ठरु शकतं.थायरॉईड झाल्याचं लवकर समजल्यास त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होते. औषधं किंवा लाईफस्टाईलमध्ये बदल केल्यास यावर नियंत्रण मिळवता येतं. याची लक्षणं फारच छोटी असतात आणि ती समजण्यास कठीण असतात. त्यामुळे थायरॉईड झालाय की नाही हे तपासण्याचा सर्वात चांगला उपाय म्हणजे रक्त तपासणी. रक्ताद्वारे टीएचएच लेव्हलची तपासणी करता येते.यावर डॉक्टर सांगतात की, डायबेटिजचे रुग्ण, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असणारे लोक, अनुवांशिकता, हार्मोन्समध्ये बदल, गरोदरपणा किंवा मेनोपॉज, वाढतं वय असलेल्या व्यक्तींमध्ये थायरॉईडचं प्रमाण सर्वाधिक असतं. त्यामुळे मेनोपॉज किंवा मेनोपॉजच्या जवळ असलेल्या महिलांनी थायरॉईडची तपासणी करणं गरजेचं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here