मतदार नसलेल्यांनी उद्या ६ नंतर जिल्ह्यात थांबू नये; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

0

 

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार रविवारी (दि. २१) सायंकाळी सहानंतर बंद होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदार नसलेल्या बाहेरील व्यक्तींसह राजकीय पक्षांशी निगडित किंवा प्रचारकार्यात कार्यरत असणाºया बाहेरील व्यक्तींंना सायंकाळी सहानंतर कोल्हापूर जिल्ह्यात थांबता येणार नाही. त्यांनी मुदतीपूर्वीच जिल्ह्याबाहेर जावे, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी दिले.
लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत मंगळवारी (दि. २३) सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १२६ अन्वये मतदान समाप्त होण्यासाठी निश्चित केलेली वेळ समाप्त होण्याच्या कालावधीपूर्वी ४८ तासांच्या कालावधीत प्रचार बंद करण्याची तरतूद केली आहे.

या तरतुदीनुसार जिल्ह्याबाहेरील व्यक्ती किंवा जिल्ह्यातील मतदार नाहीत अशा व्यक्ती तसेच राजकीय पक्षांशी निगडित किंवा प्रचारकार्यात कार्यरत होत्या अशा व्यक्तींना उद्या, रविवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर जिल्ह्यात थांबता येणार नाही. निवडणुकीतील प्रचारादरम्यान राजकीय पक्ष प्रचारकार्यास मदत करण्यासाठी मतदारसंघाबाहेरील समर्थकांना संघटित केले जाते. प्रचार कालावधी संपल्यांनतर, मतदारसंघात कोणताही प्रचार करता येणार नसल्याने मतदारसंघाच्या बाहेरून आणण्यात आलेले राजकीय पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते, मिरवणुकीतील व प्रचार मोहिमेतील कार्यकर्त्यांना मतदारसंघात उपस्थित राहू देऊ नये. कारण त्यांच्या उपस्थितीमुळे मुक्त व निष्पक्ष वातावरण धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक प्रशासन, पोलीस प्रशासनाने प्रचारमोहिमेचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर तत्काळ संबंधितांनी मतदारसंघ सोडला आह का, याची खातरजमा करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
राजकीय पक्षांनी खबरदारी घ्यावी
या आदेशाचे सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी पालन करून मुदतीनंतर जिल्ह्णाबाहेरील व्यक्ती प्रचारकार्यात सामील असणार नाहीत व त्या जिल्हा व मतदारसंघाबाहेर जातील याची खबरदारी घ्यावी, अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी देसाई यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here