ज्यांनी शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे पाप केलं त्यांना विजयी करणार का?- पाल ग्रामस्थांचा संतप्त सवाल

0

भुदरगड ( प्रतिनिधी ) : भुदरगड तालुक्यातील पाल येथे खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ मेळावा संपन्न झाला. यावेळी बोलताना सत्याप्पा पाटील यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. ज्या कर्जमाफीचा लाभ देशभरातल्या शेतकऱ्यांना झाला त्या कर्जमाफी पासून कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी वर्ग मात्र वंचित राहिला. हे पाप कुणाचा आहे? हे साऱ्या जिल्ह्याला ठाऊक आहे. अशा लोकांना शेतकऱ्यांची मतं मागण्याचा अधिकार नाही असा टोला त्यांनी लगावला. याप्रसंगी अशोक यादव, गणेश पाटील, विलास पाटील, रमेश पाटील, मधुकर कांबळे, रवींद्र पाटील, महादेव चव्हाण, बाळासाहेब तानवडे,संजीत पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here