ज्यांनी अहोरात्र जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेतला त्या धनंजय महाडिक यांना विजयी करणं हे कोल्हापूरच्या जनतेचं ध्येय – आमदार हसन मुश्रीफ

0

 

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : कोल्हापुरातील फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत परिसरात मिसळ पे चर्चा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आनंदराव खेडकर,प्रकाश इंगवले, सर्जेराव पाटील, जयसिंह माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत कोल्हापूरच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यांना विजयी करून विकासाचा हा प्रवाह गतिमान ठेवूया असं आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं.

यावेळी रामचंद्र यादव,मानसिंग पाटील, रचना मोरे, कृष्णात इंगवले, संजय पाटील, अमोल माने, प्रदीप माने, पैलवान संजय पाटील, विनायक पाटील, विश्वास कळके, राजू कसबेकर, बाळासाहेब पाटील, शरद दिवसे, संजय कांबळे, दीपक माने, विनायक मोरे,अनिल बोडके यांच्यासह अन्य मान्यवर, कार्यकर्ते, महिला आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here