शालार्थ वेतनासह ऑनलाईनचे कोणतेही काम करू नये – जिल्हा शिक्षक समन्वय समितीचे पंढरपुरात आवाहन

0

पंढरपूर : प्रशासनाच्या दबावाला, भूलथापांना बळी न पडता शिक्षकांनी शालार्थ वेतन प्रणातील पगारीची माहितीही ऑनलाईन भरू नये असे आवाहन आज सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने पंढरपूर येथील मुख्याध्यापक विशेष प्रेरणा सभेत करण्यात आले.

                जिल्हयाताल  प्राथमिक शिक्षकांनी १८ नोव्हेंबर रोजी धरणे आंदोलन करून ऑनलाईन कामावर बहिष्कार घातला होता. तेंव्हापासून ऑनलाईन कामं जवळजवळ थांबली आहेत, परंतु शालार्थ वेतन प्रणाली ही शिक्षकांच्या पगारीचा किंबहुना रोजी रोठीचा विषय असल्याने तसेच अधिकाऱ्यांचा हे काम करण्यासाठीचा दबाव येत असल्याने हे करावे की नाही अशी संभ्रमावस्था निर्माण होत आहे. काही शिक्षक याला बळी पडून शालर्थचे काम करीत असल्याने यांना थांबवून बहिष्कार १००% यशस्वी करण्यासाठी पंढरपूर येथे मुख्याध्यापक व तंत्रस्नेही यांच्यासाठी विशेष प्रेरणा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

                  शिक्षकांचा पगार करण्याची जबाबदारी ही गटशिक्षणाधिकाऱ्यांची असून तेच हे काम पूर्वीप्रमाणे करतील. शिक्षकांनी फक्त शाळेत शिकवावे. होणाऱ्या कारवाईची भिती न बाळगता बहिष्कारात सहभागी व्हावे तसेच समन्वय समिती शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असणार आहे असे आवाहन या व्यासपीठावरून करण्यात आले. यावेळी या सभेत राज्यातील शिक्षकांचे नेते बाळासाहेब काळे, मछिंद्रनाथ मोरे, शिवानंद भरले, अनिल कादे, राजाराम चव्हाण, इकबाल नदाफ, आदींची भाषणे झाली. यावेळी अरूण नागणे, अंकुश काळे, दादाराजे देशमुख, उत्तमराव जमदाडे, सुर्यकांत हत्तूरे-डोगे, राजाभाऊ यादव, तात्यासाहेब यादव, ज्योतीराम बोंगे आदि विविध संघटनांचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते, तर या सभेस बहुसंख्येने मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here