लहान वयातील मुलींवर बलात्काराच्या घटना जास्त होत असल्याने कठोर कायदे करण्याची आवश्यकता – मनोहर लाल खट्टर

कठोर नियम झाल्याने लहान मुलींवरील बलात्काराचे प्रमाण कमी होईल

0

चंदिगड :- १२ वर्षे किंवा त्याहून लहान वयाच्या मुलीवर बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावण्यात येऊ शकते. अशाप्रकारे कठोर नियम झाल्याने लहान मुलींवरील बलात्काराचे प्रमाण कमी होईल, अशी हरयाणा सरकारला आशा आहे. यासंदर्भातील विधेयक लवकरच विधानसभेत सादर होणार असल्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिले.
लहान वयातील मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटना जास्त असल्याने याविषयात कठोर कायदे करण्याची आवश्यकता असल्याचे खट्टर म्हणाले. याशिवाय बलात्काराच्या घटनांचा लवकरात लवकर निकाल लागावा, यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here