तर मी जय महाराष्ट्र म्हणेन…

0

सुप्रीम कोर्टाच्या निर्णया प्रमाणे बेळगाव महाराष्ट्रात जात असेल तर सर्वात पहिला भगवा झेंडा माझ्या हाती असेल आणि जय महाराष्ट्र म्हणणारी मी पहिली असेन असे वक्तव्य केले आहे राज्य प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांनी.

बेळगाव तालुक्यातील देसुर आणि बसरीकट्टी येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

आगामी काही महिन्यातच विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने हेब्बाळकर या  बेळगाव ग्रामीण मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत ग्रामीण मतदार संघात मराठी भाषिकांची मत बहुसंख्य असल्याने मराठी मतदारांना खुश करण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केले असावे असा राजकीय विश्लेषकांच मत आहे.
सर्वात पहिला जय महाराष्ट्र म्हणू अस मराठी पोषक वक्तव्य केल्याने बेळगावातील राजकारणात खळबळ माजली असून कन्नड संघटना हेब्बाळकर यांच्या विरोधात आक्रमक बनल्या आहेत सर्वच प्रादेशिक वृत्त वाहिन्यांनी या बातमीला अग्रक्रम दिला आहे.

जय महाराष्ट्र या घोषणेवर नवीन विधेयक आणून बंदी आणू अशी भाषा करणाऱ्या  काँग्रेस सरकार च्या जबाबदार महिला नेत्या कडून वक्तव्य हे वक्तव्य झाल्याने मराठी भाषिकांना खुश करण्याचा प्रयत्न आहे असे देखील बोलले जात आहे
एकीकडे मंत्री रोशन बेग जय महाराष्ट्र वर बंदी ची भाषा करतात तर दुसरीकडे त्याच पक्षातील हाय प्रोफाईल महिला नेत्या लक्ष्मी हेब्बाळकर जय महाराष्ट्र म्हणू अस वक्तव्य करतात यात फक्त राजकारण आहे अशी जोरदार चर्चा सुरू आहे.राज्य काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांना मराठीचा पुळका असेल तर  त्यांनी भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार सीमा भागातील मराठी जणांना का सरकारी परीपत्रक मराठीत दिली नाही असा सवाल देखील एका नेत्याने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here