किरण भगतने मारले पिंजऱ्यातल्या कुस्तीचे मैदान

किरण भगतने तोडले लोखंडी पिंजऱ्याचे कुलूप... देशात पहिल्यांदाच पार पडल्या लोखंडी पिंजऱ्यातील कुस्त्या

0

प्रतिनिधी : सर्फराज सनदी

सांगली : कुस्ती शौकिनांना लोखंडी पिंजऱ्यातील कुस्त्यांचा थरार सांगलीमध्ये  पाहायला मिळाला.  या पिंज-यातल्या wwe  चॅम्पियन मनजीत सिंगला धूळ चारत महाराष्ट्र उपकेसरी किरण भगत याने पिंजऱ्यातील कुस्तीचे मैदान मारले. लोखंडी पिंजऱ्यात फ्री स्टाईल कुस्ती पाहण्यास कुस्ती शौकिनांची मोठी गर्दी झाली होती.

महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या कुस्ती क्षेत्रात नवा ट्रेंड निर्माण करणाऱ्या पिंजऱ्यातील कुस्त्या सांगलीमध्ये पार पडल्या. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाचा अश्या कुस्त्या आयोजित करण्यात आल्या होत्या. ७० वर्षापूर्वी अश्या कुस्त्या भारतामध्ये पार पडल्या होत्या. त्यांनतर आज सांगलीमध्ये देशात पहिल्यांदाच पिंजऱ्यातील फ्री स्टाईल कुस्ती पार पडल्या.
संपूर्ण कुस्ती क्षेत्राचे या कुस्त्यांकडे लक्ष लागून राहिले होते. wwe चॅम्पियन पैलवान मनजीत सिंग आणि महाराष्ट्र उपकेसरी पैलवान किरण भगत यांच्यामध्ये हि कुस्ती पार पडली आहे. तुझ्यात जीव रंगला मालिका फेम हार्दिक जोशी उर्फ राणादा याच्या हस्ते या लढती लावण्यात आल्या.  यानंतर लाल मातीत आणि लोखंडी पिंजऱ्याच्या आत wwe चॅम्पियन पैलवान मनजीत सिंग आणि महाराष्ट्र उपकेसरी पैलवान किरण भगत यांच्यात थरारक कुस्ती झाली. ज्यामध्ये महाराष्ट्र उपकेसरी किरण भागात wwe चॅम्पियन पैलवान मनजीत सिंग याला धूळ चारत चितपट करत पिंजऱ्यातील कुस्तीचे मैदान मारले.
पैलवान कुस्ती प्रेमी या संस्थेच्या उदघाटनानिमित्त या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here