जादूटोणा व नरबळी कायदयाच्या जनजागरणाचे काम दोन वर्ष ठप्प…

0

औचित्याच्या मुद्यातून आमदार हेमंत टकले यांनी सरकारची केली पोलखोल…

पुन्हा जनजागरण सुरु करण्याची केली मागणी…

नागपूर  नरेंद्र दाभोळकर यांचे कार्य केवळ कायदा केल्यामुळे साध्य होणार नाही. मुख्यमंत्री आणि सरकारने नरेंद्र दाभोळकर यांचे थांबलेले काम पुन्हा सुरु करावे आणि जादुटोणा व नरबळी विरोधी कायदयाची अंमलबजावणी होण्यासाठी जनजागरण पुन्हा सुरु करावे अशी मागणी आमदार हेमंत टकले यांनी औचित्याच्या मुद्दयाद्वारे केली.

नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रामध्ये जादुटोणा व नरबळीविरोधी कायदा पारीत झाला मात्र गेल्या दोन वर्षापासून जादूटोणाविरोधी जनजागरण थांबवण्यात आले आहे. या कायदयाची अंमलबजावणी करण्यासाठी दरवर्षी तीन कोटींची तरतुद केली जात होती परंतु दोन वर्षामध्ये एक रुपयाही सामाजिक न्याय विभागाने खर्च केला नसल्याचा मुद्दा आमदार हेमंत टकले यांनी उपस्थित करुन सरकारची पोलखोल केली.

मागच्या सरकारच्या काळामध्ये १४ कोटींच्या निधीची तरतुद झाली होती. मात्र तो निधी तांत्रिक कारणांमुळे मिळू शकला नव्हता. फक्त एक कोटी रुपयांचा निधी मिळाला.त्यामध्ये ३५ जिल्हयामध्ये जाहीर सभा झाल्या तर २२ जिल्हयामध्ये ३५७ शाळांमध्ये जादूटोणा कायदा व जादूची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांचेही प्रशिक्षण या अभियानातंर्गत झाले असल्याची माहिती आमदार हेमंत टकले यांनी दिली. आता हे सारे काम थांबले आहे. केवळ कायदा केल्याने नरेंद्र दाभोळकरांचे ध्येय साध्य होणार नाही असेही आमदार हेमंत टकले म्हणा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here