बेजबाबदार वाहनधारक:बेशिस्त वाहतूक नागरिक बेहाल …. मुरगूडच्या आठवडी अर्थकारणावर परिणाम जीव मुठीत धरून जगताहेत मुरगूडकर ?…

0

बेजबाबदार वाहनधारक:बेशिस्त वाहतूक नागरिक बेहाल ….
मुरगुडच्या आठवडी अर्थकारणावर परिणाम
जीव मुठीत धरून जगताहेत मुरगुडकर ?…

BY Newstale
Correspondent
Murgud 3 March 2019
मंगळवारच्या आठवडी बाजारामध्ये लागलेली दुकाने,फळांचे स्टॉल आणि अस्ताव्यस्त पार्किंग यामुळे मुरगुड बस स्थानक,ग्रामीण रुग्णालय,नगरपालिका, नाका,तुकाराम चौक परिसर,सर पिराजी रोड,मुरगुड विद्यालय परिसर या भागांमध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी होते.हजारो नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.वाहतुकीच्या समस्या या भागाला ग्रासलेली आहे.त्यात भरीतभर जांभूळखोरा परिसरातून  निपाणी-देवगड रस्त्याच्या डांबरीकरणासाठी डांबर खडी सोडणाऱ्या शहरातील डेपोतून ये जा करणाऱ्या डंपरमुळे वाहतुकीची समस्या अधिक उग्र बनलेली आहे.

बाजार हाच आर्थिक कणा…
मुरगूडचा आठवडी बाजार येथील लोकांच्या अर्थकारणाचा कणा असल्यामुळे त्याचे महत्व आहे. परिसरातील 50 गावातील लोक,व्यापारी या ठिकाणी बाजारासाठी येत असतात. लाखो रुपयांचा व्यवहार या आठवडी बाजारात होत असतो.मंगळवारच्या बाजाराव्यतिरिक्त अन्य दिवशी आर्थिक उलाढाल मंदच असते या वाहतुकीच्या कोंडीमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.वाहतुकीच्या कोंडीमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याचा परिणाम मुरगूड मधील आर्थिक उलाढालीवर होत आहे.मुरगुड मधील स्थानिक आणि बाजारात येणारे दुचाकी,चार चाकी वाहन धारक आपली वाहने बेशिस्तपणे चालवतात.परिसरामध्ये चुकीच्या पद्धतीने वाहने पार्क करतात.आहार हॉटेल ते तुकाराम वाचनालयापर्यंत अक्षरशा वाहनांचे जथ्थेच्या जथ्थे रस्त्यावर खोळंबून उभे राहतात. त्या परिसरातील दुकानांच्या बाहेर ग्राहकांनी उभा केलेली वाहनांमुळे प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.वाहन कोंडीत अडकलेल्या वाहनधारकांची अरेरावी वारंवार घडणारे वादाचे प्रसंग यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

वाहतुकी वरती पडणारा ताण आणि वाहनधारकांचे बेजबाबदार वर्तन यामुळे अपघाताची शक्यता वाढते पण याकडे कोणाचेही लक्ष नाही त्यामुळे नागरिकांनी याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत.

शाळकरी मुले,डॉल्बी ट्रॅक्टर्स आणि झिंगाट ….

     ऊस वाहतूक,गौण खनिज वाहतूक करणारी वाहने आणि  झिंगाट गाणी कर्कश आवाजात लावून रात्री-अपरात्री मेन रोडवरून सुसाट वेगाने धावणारे दोन ट्रॉली-छकडे जोडलेलेे ट्रॅक्टर्स यांच्या दहशती खाली नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागते. वाहन धारकांचा हा बेजबाबदारपणा मुळे भयानक अपघात केंव्हा होईल सांगता येत नाही.
शाळकरी मुले दुचाकी वाहनावरून भरधाव वेगाने या परिसरातून जात येत असतात.कैफ चढल्या प्रमाणे बेदरकार गाड्या उडवणारी ही मुले अनेकदा अपघाताचे कारण ठरली आहेत.मुलांना पाठीशी घालण्यासाठी पालकही
अरेरावी करताना दिसून येतात.अशा अल्पवयीन मुलांवर व त्यांच्या पालकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी  नागरिक करत आहेत.

पालकांनी प्रवृत्ती बदलावी….किशोर खाडे पोलीस उपनिरीक्षक
मरगुड पोलिसांनी अनेकदा अल्पवयीन मोटरसायकल स्वारांना पकडून कारवाई केलीआहे.पण तरीही आपल्या अल्पवयीन मुलांकडून स्वतःची कामे करवण्यासाठी वाहन चालवण्यास देणाऱ्या पालकांच्या मनोवृत्ती मध्ये कोणताही फरक पडलेला नाही.उलट अल्पवयीन मुलांचे करिअर खराब होईल असा दबाव पोलिसांवर टाकला जातो.चुकीच्या गोष्टी करण्यास पालकच फूस देतात 200 रुपये दंड वाचवण्यासाठी राजकीय दबाव टाकला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here