जाब विचारणा-याला मारण्यासाठी काढली चक्क तलवार

 भरधाव वेगाने गाडी का चावतोय असा केडीएमसी बस ड्रायव्हरने जाब विचारला म्हणून ट्रक चालकाने काढली तलवार

0

प्रतिनिधी : पूनम पोळ

कल्याण : शुक्रवारी सकाळी साडे सहाच्या दरम्यान केडीएमटीची उसटणे कल्याण  एमएच 05 आर 1241 ही बस कल्याणच्या दिशेने नेतीवली नाक्याजवळून जात होती.  त्यावेळी समोरून एक ट्रक भरधाव वेगाने आल्याने बसमधील प्रवाशांचा थरकाप उडाला. केडीएमटी बसचालक विलास तलवारे यांनी ट्रक डायव्हरला जाब विचारला असता संतप्त झालेला ट्रक चालक हरपित सिंग व त्याचा क्लिनर गुरपीत सिंग या दोघांनी आपल्या ट्रक मधील तलवार काढून बस चालकाला मारण्यासाठी धाव घेतली.  भर रस्त्यात हा प्रकार घडल्याने नेतीवली नाका येथे एकच खळबळ उडाली होती. या घटने दरम्याण वाहतूक कोंडी झाली होती.  बस मधील प्रवाशांनी प्रसंगावधान राखत बस चालकाची सुटका केल्याने पुढचा अनर्थ टळला.  सदरची घटना कळताच परिवहन उपक्रमाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेतील  ट्रक चालक हरपित सिंग व त्याच्या क्लीनरला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here