हार्ले डेविडसनच्या गाडयांच्या किंमती कमी…

अडीच लाखांनी किंमती खाली...२०१७ मॉडेलवरच सूट...

0

अमेरि‍केतील कंपनी हार्ले डेवि‍डसनने आपल्या दोन मोटरसायकलची किंमत कमी केली आहे. कंपनीने 2.5 लाख रुपयांपर्यंत किंमत कमी केलीय. यामध्ये Fat Boy आणि Heritage Softail Classic यांचा समावेश आहे. हार्ले डेविडसन फैट बॉयची किंमत ही 17.01 लाख रुपये होती.(एक्स-शोरूम, दिल्ली) ती आता कमी करुन 14.99 लाख रुपये ठेवण्यात आलीय (एक्स-शोरूम, दिल्ली).
याशिवाय हार्ले डेविडसन हेरिटेज सॉफ्टेल क्लासिकची किंमत याअगोदर 18.50 लाख रुपये होती (एक्स-शोरूम, दिल्ली) ती आता कमी करुन 15.99 लाख रुपये ठेवण्यात (एक्स-शोरूम, दिल्ली) आलीय. हार्ले डेविडसन इंडिया कंपनीने जारी केलेल्या निर्णयानुसार ही कमी करण्यात आलेली किंमत 2017 च्या मॉडेलवरच लागू करण्यात आलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here