शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योगाकडे वळविण्याची गरज -महेश झगडे

कृषी महोत्सवात सेंद्रीय उत्पादने खरेदी करण्याची संधी

0

नाशिक : कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवी दिशा देताना त्यांना अन्न प्रक्रिया उद्योगाकडे वळविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.

महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्यावतीने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब) येथे आयोजित नाशिक जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते

श्री.झगडे म्हणाले, प्रक्रिया केलेले अन्न खाण्याकडे नागरिकांचा कल वाढतो आहे. ही चांगली संधी समजून शेतकऱ्यांनी शेतमालाचे उत्पादन घ्यावे आणि एकत्रित येऊन त्यावर प्रक्रिया करावी. देशात केवळ तीन टक्के शेतमालावर प्रक्रिया होत असून हे प्रमाण वाढविण्यासाठी कृषी विभागाला प्रयत्नपूर्वक शेतकऱ्यांची मानसिकता तयार करावी लागेल. प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात शेतमालावर प्रक्रियेचे प्रमाण वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.

नाशिक जिल्ह्यात प्रथमच आयोजित केलेल्या कृषी महोत्सवात 236 स्टॉलची उभारणी करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील अनेक शेतकरी बचत गटांनी सहभाग घेतला असून सेंद्रीय भाजीपाला, फळे आणि अन्नधान्य खरेदी करण्याची संधी नागरिकांना आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here