कोरेगाव भीमा प्रकरणातला मास्टरमाईंड सरकारने शोधला नाही : अजित पवार

तुमचं माझं राज्य या सरकारने कर्जबाजारी केले

0

प्रतिनिधी : अभयकुमार देशमुख

अंबाजोगाई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वचनपूर्ती करणारा पक्ष आहे. भूलभलैय्या करणारा नाही त्यामुळे येत्या काळामध्ये नंबर एकचा महाराष्ट्र कासा होईल तो सुरक्षित कसा राहिल यासाठी काम करायचे आहे. अजित पवार हल्लाबोल यात्रेतील जाहीर सभेत बोलत होते.

राज्यसरकारची प्रशासनावर पकड राहिलेली नाही हे कोरेगाव भीमा प्रकरणानंतर दिसून आले. समाज कसा दुभंगला जाईल, समाजासमाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल, तरुणांचा उद्रेक कसा होईल अशा प्रकारच्या का घटना घडू दिल्या जात आहेत. याच्यामागे कोण मास्टमाईंड आहे याचा शोध सरकारने घ्यायला हवा होता परंतु सरकारकडून तसे झाले नाही अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

तुमचं माझं राज्य या सरकारने कर्जबाजारी केले आहे. या सरकारने आपल्या डोक्यावर ८ लाख कोटीचे कर्ज करुन ठेवले आहे. हे सरकार फक्त आश्वासनेच देत आहे. नुसत्या आश्वासनावर, जाहिरातींवर फक्त लोकांनी जगावं का असा सवालही अजित पवार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here